तो म्हणाला आज ‘वॅलेनटाइन डे’

तो म्हणाला आज ‘वॅलेनटाइन डे’
ती म्हणे,नवे काय? रोजचेच रडे

चल ना गं.. मस्त कॅण्डेललाइट डिनर घेऊ
ती म्हणे बरं..! मुलांना सोबत घेऊन जाऊ

तो लाडात.. थोडा रोमॅन्टिक !
ती मात्र जुनी.. तशीच अॅन्टिक !

त्यानं म्हटलं, आज बायको नको गं..
तुझ्यातली प्रेयसी हवी
तिने हसत म्हणाली, तुम्हांला काय..!
रोज नवी फॅण्टसी हवी

तो म्हणाला चालेल गं, इतकंही हसलीस तरी !
हाती हात घेऊन घटकाभर जवळ बसलीस तरी

त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली
आणि मधाळंसं हसत पुन्हा फुलून गेली

त्याला म्हणाली..
वेड्या……..!
हा ‘वॅलेनटाइन डे ‘ फक्त
वर्षातून एकदाच साजरा होतो..
तुझ्या नजरेनं माझा चेहरा मात्र
कुठल्याही ‘डे’ ला लाजरा होतो..

नजरेत नजर मिसळायला
कॅण्डललाइटचं टेबल लागत नाही
अन एकरुप झालेल्या जीवांना
‘वॅलेनटाइन ‘चं लेबल लागत नाही

VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)