1st May (Maharashtra Din)

इंग्रजीच्या नादापाई

इंग्रजीच्या नादापाई,
मराठीचा डब्बा गोल ।।
मराठी माणसा,
आता तरी मराठीत बोल ।।

इंग्रजीच्या पेपरात होतो
वर्ग सारा पास ।।
पण मराठीचा पोरगा होतो
मराठीत नापास ।।

प्रेम करतो म्हटलेकी
पोरगी समजते शंेबड्या ।।
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या ।।

माय झाली मॉम आणि
बाप झाला डयाड।।
रेव्ह पार्टीत नाचून
पोर झाली मॅड ।।

भांडण करते बायको
धरते एकच हेका ।।
कायबी झालं तरी चालंल
पोरगं इंग्लीश शाळंत टाका ।।

मराठी माणसापासूनच आहे
खरा मराठीला धोका ।।

शाळेला मिळत नाही
मराठीचा शिक्षक,
मराठी माणूसच आहे
मराठीचा भक्षक ।।

तुकोबाची अभंगवाणी,
आन् मराठीचा गोडवा।।
मराठी माणसाचे नववर्ष
असतो गुडी पाडवा ।।

सावध व्हा मित्रहो,
जपा मायबोली ।।
भाषा रक्षणासाठी
बोला मायबोली ।।

।। जय महाराष्ट्र, मी मराठी ।।

28 Aug, 2013 By In: 1st May (Maharashtra Din) मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

जय महाराष्ट्र

आमचे ‘राजेपण’,
आमचा ‘रुबाब ‘,
आमची ‘दादागिरी’,
कालपण, आजपण, उदयापण …
फक्त आवाज टाका, “तुमच्यासाठी काहीपण कधीपण आणि कुठूनपण.

जय महाराष्ट्र …

——————————————————-

Aamche ‘RAJEPAN’ .
Aamcha ‘RUBAB’
Aamchi ‘DADAGIRI’
Kalpan,aajpan,udyapan….

Fakt aawaj taka,’ “Tumchya  Sathi  Kaypan  Kadhipan ani Kuthapan”.

Jay Maharashtra

2 May, 2013 By In: 1st May (Maharashtra Din) मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)