परवा एक मित्र भेटला लहानपणचा…

परवा एक मित्र भेटला लहानपणचा… खूप दिवसांनी… घट्ट मिठी, हातात हात, खूप आठवणी.. खूप गप्पा..

“आई कशी आहे रे?”

क्षणांत डोळे भरले त्याचे…

“आई माझ्याकडे नसते रे हल्ली.. गेली दोन वर्ष वृद्धाश्रमांत आहे… आजच वाढदिवसाला भेटून आलो तिला.

त्याने विचारले “तुझी आई तुझ्याकडेच असते नां?”

“देवाची कृपा आहे. मला आईपेक्षा मोठं नाही केलं त्याने.
आई माझ्याकडे नसते… मीच आईकडे राहतोय…
….जन्मापासून”

VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)